spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नांदलपार शाळेकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात

– किचन शेड किंवा शौचालयाचे छप्पर नाही

तिरोडा :- तिरोडा तालुक्यातील नांदलपार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शौचालयाला छप्पर आणि स्वयंपाकघर शेड नसल्यामुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

तिरोडा तालुक्यातील नांदलपार गावातील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी इयत्ता आहे. शाळा गावाबाहेर आहे. स्वयंपाकघर शेड नसल्याने बाहेर स्वयंपाक करावा लागतो. शौचालये असली तरी छप्पर नसल्याने विद्यार्थ्यांना बाहेर लघवी आणि शौचास जावे लागते. गेल्या चार वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे, परंतु शाळा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

नांदलपार गावातील शाळा गावाबाहेर असल्याने, वन्य प्राणी परिसरात फिरतात. त्यामुळे शौचालय वापरण्यासाठी मुले बाहेर जाणे धोकादायक ठरू शकते. वन्य प्राणी अनेकदा भटकंती करतात. जर एखादा विद्यार्थी त्यात अडकला तर जिवितहानी देखिल होऊ शकते.अशा वेळी शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी तिरोडा तहसीलच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याबाबत माहिती दिली आहे. किचन शेड आणि शौचालयाची छप्पराची मागणी केली आहे. याची माहिती मिळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे महेंद्र भांडारकर यांना मिळताच प्रशासनाने यांची दखल न घेतल्यास विद्यार्थ्यांच्या पालकांसह आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Popular Articles