spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निवासी शाळा सरांडी येथे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा ज्येष्ठाचे शाल देऊन सत्कार

तिरोडा :- तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथे 1 आक्टोबर ला शाळेचे मुख्याध्यापक मेंढे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मेंढे तसेच विशेष अतिथी म्हणून सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थिनीचे आजी आजोबा ज्येष्ठ नागरिक म्हणून उपस्थित होते. त्याचा या कार्यक्रम प्रसंगी शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमातून ज्येष्ठ नागरिकांनी अतिशय सुंदर गीत गायन आणि मुलींना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी शिक्षक प्रवीण कौंडलकर ,कामडी , ढवळे, उंदिरवाडे शिक्षिका यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.तसेच या कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Popular Articles