spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

39 वर्षापासून भव्य भोजनदान सोहळ्याचे आयोजन

– ज्योतिरामजी लोखंडे बहुउद्देशीय संस्थेतर्फे भव्य-भोजनदान सोहळा संपन्न

नागपूर :- ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर देश- विदेशातून येण्याऱ्या धम्मबांधव-भगिनींकरिता ३८-३९ वर्षांपासून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य सस्नेह-भोजनदान सोहळ्याचे आयोजन ज्योतिरामजी लोखंडे बहुउद्देशीय संस्था नागपूर द्वारा ३ ऑक्टोबर रोजी शुक्रवारला ज्योतिवृक्ष निवास, ज्योतीराम लोखंडे चौक, घाटरोड, नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात बौद्धभिक्खू व संस्थेचे पदाधिकारी यांचेसह रीमा श्यामू लोखंडे, यशोधरा बलदेव लोखंडे, रमेश ज्योतिराम लोखंडे, राजू ज्योतिराम लोखंडे, सत्यभामा रमेश लोखंडे, मीनाक्षी राजू लोखंडे, सुदर्शन लोखंडे, सूर्यकांत लोखंडे, आकाश लोखंडे, प्रभात लोखंडे, लक्ष्मीकांत लोखंडे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमास दीक्षाभूमीवर आलेल्या बौद्धबांधव-भगिनींनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्नेहभोजन सोहळा संपन्न झाला.

Popular Articles