spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

न.प. राजेंद्र हायस्कूलचे कुस्तीपटू विभागस्तरावर

खापा :- नुकत्याच सुरेश भट सभागृह रेशीमबाग, नागपुर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत स्थानिक न.प. राजेंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या तीन कुस्तीपटूंनी घवघवीत यश प्राप्त केले.

या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात भावेश विनोद चौधरी (४४ किलो), १७ वर्ष वयोगटात संदेश मुकेश मरकाम (५१ किलो), भावेश राजेंद्र नाचनकर (७० किलो) या खेळाडूंनी विजय मिळविला. त्यांची विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कुस्तीपटूंच्या या यशाबद्‌दल शाळेचे मुख्याध्यापक सुनिल नेहारे, मुख्याधिकारी सुमेध अलोने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश मोहटे, व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, पालक संघ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विजेत्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. सर्व खेळाडू शाळेचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक शामराव खडसे यांचा मार्गदर्शनात सराव करतात.

Popular Articles