spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गोंदियात १५८ अनुकंपा धारकांना आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करणाऱ्या ४३ लोकांना नियुक्ती पत्राचे करण्यात आले वाटप

गोंदिया :- गोंदिया जिल्यात आज १५८ अनुकंपा धारकांना आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करणाऱ्या ४३ लोकांना जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांच्या हस्ते शासकीय सेवा नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आल्याने अनुकंपा धारकांच्या चेहऱ्यावर आनंद पाह्यला मिळाला ,तर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास होऊनही नियुक्ती पत्र न मिळाल्याने निराश होऊन बसलेल्या लोकांना देखील शासकीय सेवेचे नियुती पत्र मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद पाह्यला मिळाला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुबईत देखील राज्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकंपा धारकांना आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास होऊन शासकीय नोकरी मिळविणाऱ्या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत तर ७० % अनुकंपा धारकांच्या नियुक्त्या राज्यात करण्यात आल्या असून आणखी २० % लोकांच्या नियुक्त्या बाकी असून त्यांना देखील लवकरच न्याय मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात नियुक्ती पत्र वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी सर्वच विभागाचे विभाग प्रमुख आणि अनुकंपा धारक तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत पास झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Popular Articles