नागपूर :- अखिल भारतिय माळी महासंघ व क्रांतीज्योती माळी विकास संस्था नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने माळी समाजातील राज्यस्तरीय उपवर युवक – युवतीचे पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या रविवार, दि. १२ आक्टोबर २०२५ रोजी, गिता मंदीर सुभाष रोड कॉटन मार्केट नागपूर येथे सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत माळी समाजातील उपवर युवक – युवती पालक परिचय होईल. तसेच मोठ्या प्रमाणात विवाह योग्य युवक युवती परिचय व ‘शुभमंगलम’ या परिचय पुस्तीकेचे विमोचन करण्यात येणार आहे. याबाबतची नियोजन बैठक नुकतीच विश्वभारती काम्प्यूटर इन्स्टीट्यूट लोकमत भवन येथे अध्यक्ष गोविंदराव वैराळे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. याप्रसंगी पद्माकर भेलकर उटघाटक, स्वागताध्यक्ष मधुसुदन देशमुख, संयोजक कैलास जामगडे सरचिटणीस शिवराम गुरनूले, अंबादास गाडेकर, प्रभाकर जेंगठे, अमोल वैराळे, अशोक बनसोड, अनिल वऱ्हेकर, अरुण ढाकूलकर, प्रभाकार कळसकार, संदीप राउत, गणेश कडूकर, संजय सारवे, पुजा बनकर, गोविंद तितर, नामदेव लांजेवार, विजय सातोकर, प्रदीप मांदाडे, विजय सोनूले, नरेंद्र गाऊत्रे व समाज बांधव उपस्थित होते. माळी समाजातील उपवर युवक युवतीची नोंदणी www.kjmalivikas.com वर ऑन लाइन पध्दतीने करण्यात येइल. तसेच वर्धा रोडवरील लोकमत चौकात प्रमूख कार्यालय विश्वभारती कॉम्पुटर इन्स्टीट्यूट लोकमत भवन चौक किंवा इतर नोंदणी संपर्क प्रमुखाव्दारे करण्याचे आवाहन गोविंद वैराळे व आयोजन समीतीव्दारे करण्यात येत आहे. समाज बांधवानी या मेळाव्यासाठी सहकार्य करावे व या मेळाव्याचा विवाह जोडणीस उपयोग घ्यावा. असे निवेदन प्रसिद्धी प्रमुख देवराव प्रधान यांनी केले आहे.



