– विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांचा उत्साहपूर्ण सहभाग
नागपूर :- बुटीबोरी ८ ऑक्टोबर रोजी आयटीआय बुटीबोरी येथे पंतप्रधानांच्या शुभहस्ते विविध अल्पकालीन कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे ऑनलाइन उद्घाटन संपन्न झाले.या कार्यक्रमात संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर पाहुण्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. याप्रसंगी विद्या विनय हरदास ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मिलिंद कोवे (उपसरपंच, गटग्रामपंचायत धानोली (गुमगाव) विनय हरदास (अभियंता) उद्घाटक विश्वकर्मा लाभार्थी लिलाधर पंढरी चौधरी, प्राचार्य मुरलीधरराव गायकवाड, गटनिदेशक शैलेंद्र कुंटे, गटनिदेशक सुधीर कांबळे तसेच शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचा उद्देश युवकांमध्ये कौशल्याधारित प्रशिक्षणाचा प्रसार करून रोजगारक्षमतेत वाढ घडविणे हा आहे. विद्यार्थ्यांनी या नवीन अभ्यासक्रमांचे स्वागत करत स्वावलंबी बनून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याची शपथ घेतली.




