जिल्हा दक्षता समिती कामठी यांची आढावा बैठक

0
48

कामठी :- जिल्हा दक्षता समिती कामठी यांची आढावा बैठक कामठी तहसील कार्यालय येथे शुक्रवार दिनांक १०/१०/२०२५ ला दुपारी २ वाजता दक्षता समितीचे अध्यक्ष राजेश रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या आढावा बैठकीमध्ये तहसीलदार जगदाळे, पुरवठा अधिकारी निशिकांत बदमोरे तसेच दक्षता समितीचे विविध नगरपंचायत व नगरपरिषद मधील दक्षता समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

प्रामुख्याने मनीष कारेमोरे, राज हाडोती, तिजारे, अंकित तुरक, अक्षय काळे, मीनाक्षी वासनिक पोपळघट , राहुल बोढारे, प्रभा राऊत, नंदा बारई, पराग पाटील, सेवक उईके, विनोद पाटील,सरिता भोयर, राजकिरण बर्वे, कुलरकर, दाहाट, प्रतीक पडोले व अन्य दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी आपल्या अध्यक्षतेमध्ये राजेश रंगारी यांनी अंतोदय योजना व राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना(PHH) यांच्या सर्व लाभार्थ्यांना अन्नपुरवठा झाला पाहिजे व ज्या लाभार्थ्यांची KYC झाली नाही त्यांची तत्काळ KYC करून लाभ द्यावा असे स्पष्ट निर्देश दिले.