spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पीएमडीडीकेवाय डाळ मिशन आणि इतर कृषी योजनांचा शुभारंभ

यवतमाळ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आकांक्षी जिल्हा विकास कार्यक्रम (PMDDKY), डाळ मिशन (Pulses Mission) आणि कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या विविध योजनांचा शुभारंभ दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी NASC कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली येथे होणार आहे.

PMDDKY अंतर्गत देशातील १०० आकांक्षी कृषी जिल्ह्यांमध्ये विविध मंत्रालये आणि विभागांच्या योजनांचे एकत्रिकरण (Convergence) करून त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील कृषी व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

डाळ मिशनचा मुख्य उद्देश म्हणजे देशांतर्गत डाळ उत्पादन वाढवून आत्मनिर्भरता प्राप्त करणे. ही मोहीम शेतकरी, सहकारी संस्था आणि अन्न सुरक्षा यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

या ऐतिहासिक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live Screening) देशभरातील सर्व PM किसान समृद्धी केंद्रांवर (PMKSKs) करण्यात येणार आहे. तसेच, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (DCCB) मुख्यालय आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (APMC) देखील हे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम खालील लिंकवर थेट पाहता येऊ शकतो https://pmindiawebcast.nic.in/ जिल्ह्यातील सर्व शेतकरी, प्राथमिक सहकारी संस्था, PMKSKs वर कार्यरत संस्था व सभासदांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.