spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

श्री. विठ्ठल रूक्मिणी देवस्थान ट्रस्ट धापेवाडा (विदर्भाचे पंढरपूर) येथे आषाढी एकादशी निमित्य लावण्यात आला कडेकोट बंदोबस्त, पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा यांनी केली बंदोबस्ताची पाहणी.

धापेवाडा ०७ : पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत मौजा धापेवाडा (बु) येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा श्री. विठ्ठल रूक्मिणी देवस्थान ट्रस्ट धापेवाडा (विदर्भाचे पंढरपूर) येथे आषाढी एकादशी निमित्य दिनांक ०६/०७/२०२५ व दि. १२/०७/२०२५ रोजी यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यादरम्यान अंदाजे ९० ते ९५ हजार पेक्षा जास्त भाविक तसेच २५० ते ३०० पेक्षा जास्त दिंड्या आणि पालख्यांचे आगमन होत असते.
मौजा धापेवाडा येथील श्री. विठ्ठल रूक्मिणी देवस्थान येथील यात्रे निमित्य  हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जिल्हा विशेष शाखा, नागपुर ग्रामीण जिल्हा यांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनात सदर बंदोबस्ताची योग्य आखणी केली. सदर ठिकाणी पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलेले आहे. बी.डी.डी.एस पथक, श्वान पथक, घातपात विरोधी पथक तैनात असुन ठिकठिकाणी वैदयकीय पथके, रूग्णवाहीका, मदत पथके, अग्निशमन दल इत्यांदीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नदीकाठी जीवरक्षक हजर ठेवण्यात आलेले आहे. योग्य वाहतुक व्यवस्थापन करण्यासाठी बंदोबस्त नेमण्यात आला आहे. सदर बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी  अनिल म्हस्के, सहा पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी, सावनेर हे असुन सदर बंदोबस्तात २ पोलीस निरीक्षक, १७ सपोनि पोउपनि, ८६ पोलीस अंमलदार २६ महीला पोलीस अंमलदार, ३८ वाहतुक पोलीस अंमलदार, १ दंगा नियंत्रण पथक वाहनासह असे अधिकारी/अंमलदार नेमण्यात आलेले आहे. 3
आज दिनांक ०६/०७/२०२५ रोजी  हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा यांनी  विक्मणी ऐवस्थान ट्रस् थापेभाडा येथे भेट देवुन संपुर्ण मंदीर २
परीसराची तसेच बंदोबस्ताची पाहणी केली. तसेच सदर यात्रा दिनांक १२/०७/२०२५ रोजी पावेतो असुन बंदोबस्तात हजर असलेल्या पोलीस अधिकारी/अंमलदार यांना सतर्कतेने बंदोबस्त पार पाडण्याबाबत सुचना दिल्या आहे. सदर वेळी श्री रमेश धुमाळ, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा हे सुध्दा हजर होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.