काटोल :- सहयोग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था आणि बुद्धिस्ट मंगल परिणय ग्रुप नागपूर यांच्यावतीने काटोल शहरातील भव्य दिव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा दिनांक 19 ऑक्टोबर रविवारी दुपारी 12 ते 4 या वेळेत पंचशिल बुध्द विहार रेल्वे स्टेशन रोड, काटोल येथे आयोजित केलेला आहे. यावेळी कार्यकमाचे प्रमुख पाहुणे दिलीप गायकवाड, काटोल आणि आकाश मेश्राम काटोल यांची उपस्थिती राहतील. या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद सोमकुवर, बुध्दिष्ट मंगल परिणय नागपूर नरेश गायकवाड सहयोग कल्याणकारी बहुउद्देशिय संस्था, नागपूर प्रा.श्रीधर सोमकुवर वरूड, हे राहतील. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद सोमकुवर यांनी केले आहे.








