नागपूर :- महासम्राट बळीराजा रथयात्रा अत्यंत भक्ती भावाने 11 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत तीर्थक्षेत्र गुरुकुंज मोझरी पासून शिवतीर्थ उमरी पर्यंत, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यामधून मार्गक्रमण करीत संपन्न झाली. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तीर्थक्षेत्र गुरुकुंज मोझरी ता.तिवसा येथे राष्ट्रीय प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज, रामपाल महाराज, संदीप पाल महाराज, इंजि. भाऊ थोटे, इंजि. पवन दवंडे, तुषार सूर्यवंशी, आकाश टाले, संदीप काळे इत्यादी सप्त खंजिरी वादक तसेच गुरुकुंज मोझरी येथील गुरुकुल आश्रमाचे संचालक रविदादा मानव, ज्ञानेश्वर रक्षक, छाया मानव, प्रेमकुमार बोके, विविध संस्थांचे कार्यकर्ते व असंख्य नागरिक यांच्या उपस्थितीत महासम्राट बळीराजा रथयात्रा चा भव्य शुभारंभ तिरंगा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

महासम्राट बळीराजा राष्ट्र सेवा संघ व इतर विविध संघटनांच्या माध्यमातून प्रा.डॉ अभिविलास नखाते व इतर संघटनांचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वात या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. बळीराजाच्या कार्याचा प्रचार प्रसार करून श्रद्धा, संस्कृती, सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय एकात्मता चा संदेश देण्यासाठी महासम्राट बळीराजा रथयात्रा काढण्यात आली. रथयात्रेमध्ये बळीराजाच्या मूर्तीची रथ, जिजाऊ शिवबा मूर्तीचा रथ, बळीराजा व शिवाजी महाराजांची झाकी, पथनाट्य, ढोल ताशे, गाण्यांचा कार्यक्रम इत्यादी सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. वं. तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त मोझरी येथील विविध उपक्रमात रथयात्रेतील भाविकांनी सहभाग घेऊन रक्तदान करून देह दानाचा संकल्प केला. विविध शहरांमध्ये व गावांमध्ये रथयात्रेचे स्थानिक नागरिकांनी व विविध संघटनांनी स्वागत करून उपक्रमामध्ये सहभागी झाले व दिवाळीला बलिप्रतिपदेच्या दिवशी महासम्राट बळीराजाची स्थानिक परिसरात शोभायात्रा काढून बळीराजाला स्मरण करून वंदन करण्याचे अभिवचन दिले. यावेळी रथयात्रेत प्रामुख्याने सेवकराम राऊत, भगवान चांदेकर, सुनीता नखाते, बबलू मेश्राम, योगराज धानोरकर, विनोद मानकर, महेंद्र सातपुते, मोहन वरारकर, कांचन ढवंगळे, हेमराज दूधकवरे, नरेंद्र लखमापुरे, सुभाष खंगार, अंकुश वैद्य, उमेश कोराम, प्रमोद वैद्य, सुजित मेश्राम, जितेंद्र पर्वते, प्रशांत येनगंदेवार, शारदा पुंडकर, सुप्रिया बल्की इत्यादी रथयात्रे सोबत होते.




