विविध योजनांवर आधारित राष्ट्रीय पोस्टर डिझाईन स्पर्धेचे आयोजन

0
65

– सहभागी होण्याचे आवाहन

नागपूर :- सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची “टर्न व्हिजन इनटू आर्ट डिझाइन द पोस्टर, सेलिब्रेट द डिकेड” अशी थीम ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली आहे.

मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्किल इंडिया, वेव्हज समिट, वातावरण बदल, योगा आदी विषय या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले आहेत.

स्पर्धकांना ए 2 आकारातील पोस्टर पीडीएफ, जेपीईजी, पीएनजी (हाय-रेझोल्यूशन) मध्ये www.pmvision२art.com या संकेतस्थळावर 21 ऑक्टोबरपर्यंत अपलोड करायचे आहेत. यासाठी 75 विजेत्यांना पारितोषिके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच त्यांची कलाकृती प्रमुख कला दालनांमध्ये प्रदर्शित केली जाईल. त्याचबरोबर विजेत्यांची कलाकृती एका विशेष कॉफी-टेबल बुकमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.