सचिन चौरसिया प्रतिनिधी,रामटेक :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल नागपूर येथे नुकत्याच झालेल्या शालेय जिल्हा क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी बजावलेल्या समर्थ ज्युनिअर कॉलेज, रामटेकच्या चार विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
स्पर्धेत कृतार्थ गिरडकर याचा लांब उडी मध्ये ५.९.६ असे अंतर गाठून प्रथम क्रमांक तर २०० मीटर धावणे मध्ये दुसरा क्रमांक पटकावला. कुस्ती स्पर्धेत हिना मसूरके हिचा प्रथम क्रमांक प्राप्त केला. समर्थ हायस्कूल मधील विद्यार्थी पारश्री डोनारकर आणि नैतिक मोहरे यांनीही उत्तम कामगिरी बजावत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत निवड झालेली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका लोखंडे, उपमुख्याध्यापक गायकवाड, सर्व शिक्षक गण, आई-वडील तसेच आप्त लोकांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेतआनंद व्यक्त करून पुढील स्पर्धे करता शुभेच्छा दिल्या.



