किशोर साहू, मौदा, ता.22 :- दरवर्षीप्रमाणे यंदा तेराव्या वर्षीही पशु गोवर्धन गिरधारी मंडळ , गट ग्रामपंचायत आजनगाव सरपंच चिंतामण सारवे व भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आज दिवाळीनिमित्त पशु गोवर्धनाच्या दिवशी बुधवार (दि. 22 ऑक्टोंबर) पासून तीन दिवसीय मंडई उत्सवाला सुरुवात झालेली आहे.
आज बुधवार (दि. 22 ऑक्टोबर )ला सकाळी नऊ वाजता पासून मोहाडी समाज प्रबोधन शाहीर माणिकराव देशमुख यांच्या संपूर्ण पार्टीसहित जनजागृती कलंगी शाहीर मंडळ यांच्या तमाशाला सुरुवात झालेली आहे. 

रात्री आठ वाजता माजी जि प सदस्य देवेंद्र गोडबोले मित्र परिवारातर्फे ह भ प तुलसी हिवरे यांच्या जाहीर कीर्तन, गुरुवार (दि. 23 ऑक्टोबर)ला सकाळी दहा वाजता हिवरा वासेरा येथील शाहीर नागोराव जीवतू यांच्या संपूर्ण पार्टीसहित समाज प्रबोधन यांच्यावर आधारित राष्ट्रीय खडा गोंधळ ,सायं. सात वाजता नागपूर येथील रोहम लावणी ग्रुप यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम तर शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजता सरपंच चिंतामण सारवे व भारतीय जनता युवा मोर्चातर्फे सुप्रसिद्ध लावणी कलावंत मयुरी उतेकर यांच्या रंगतदार लावणी नृत्यविष्काराच्या कार्यक्रमाने समारोप होणार आहे.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अध्यक्ष म्हणून माजी मंत्री सुनील केदार, माजी जि प अध्यक्ष सुरेश भोयर, उद्घाटक म्हणून खासदार श्याम बर्वे, माजी आमदार टेकचंद सावरकर , माजी जि प सदस्य देवेंद्र गोडबोले तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच चिंतामण सारवे, उपसरपंच प्रफुल मेहर, सचिव अनिल हिवरे, माजी सरपंच निशा प्रदीप पोटफोडे, पोलीस पाटील शिल्पा सुधाकर ढोणे, ग्रामपंचायत सदस्य गण प्रमोद कडव, सुभाष कोराम, विलास वैरागडे, सविता राजू ठाकरे, सुजाता रोशन वाघमारे, सविता सुनील बांते, वैशाली दिनेश डोंगरे ,कल्पना वसंता कुकडे सह तालुक्यातील, जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या तीन दिवसीय मंडई कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान सरपंच चिंतामन सारवे, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्यगनां सह पशु गोवर्धन गिरीधारी मंडळ पंचकमिटी अध्यक्ष चिंधू रोटके, उपाध्यक्ष धनराज पोटफोडे, ज्ञानेश्वर कडव, कोषाध्यक्ष सुरेश कहालकर, सह कोषाध्यक्ष मनोहर कडव, सचिव वासुदेव वैद्य, सहसचिव गोपाल पोटफोडे सह समस्त सदस्यगण व समस्त ग्रामवासीयांनी केले आहे.



