Home Latest News सर्वाधिक कचरा जमा होणाऱ्या ठिकाणांचे होणार सौंदर्यीकरण

सर्वाधिक कचरा जमा होणाऱ्या ठिकाणांचे होणार सौंदर्यीकरण

0
59

– स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांचे निर्देश

नागपूर :- सर्वात जास्त कचरा जमा होणाऱ्या शहरातील ५० ठिकणांचे नागपूर महानगरपालिकेतर्फे सौंदर्यीकरणाचे अभियान राबविण्यात येणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत ही कचरा ठिकाणे कायमची बंद करण्याचे लक्ष्य आहे. या ठिकाणी कचरा जमा होणे बंद झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडण्यास मदत होणार आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शहरातील १० झोनमधील सर्वात जास्त कचरा जमा होणारे ५० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक झोनमधील पाच सर्वाधिक कचरा जमा होणारे पॉईंट निश्चित करण्यात आले आहे. या ठिकाणांना कायमस्वरुपी बंद करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले आहेत. या ठिकाणी सर्वाधिक कचरा कां जमा होत आहे, याचे मूळ कारणे शोधून या ठिकाणी पुन्हा कचरा जमा होणार नाही, याची दक्षता स्वच्छता निरीक्षकांना घ्यावयाची आहे. यानंतर या ठिकाणांचे सौंदर्यीकरणाची जबाबदारी संबंधित स्वच्छता निरीक्षकाला देण्यात आली आहे.

हे अभियान महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत यशस्वीपणे राबविण्यासाठी आयईसी व एनडीएस पथकाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. शहरातील हे ५० सर्वाधिक कचरा जमा होणारे ठिकाणे कायमची बंद करून या ठिकाणांचे सौंदर्यीकरणाचे अभियान येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश वसुमना पंत यांनी दिले आहेत. या ठिकाणांच्या सौंदर्यीकरणानंतर या ठिकाणांवर पुन्हा कचरा जमा होणार नाही, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर राहणार आहे तसेच या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयईसीच्या पथकाने संबंधित भागात जाऊन नागरिकांमध्ये स्वच्छते बद्दल जागरुकता निर्माण करणे व या ठिकाणी कचरा टाकण्यापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करावे, असे या आदेशात म्हटले आहे.