मौदा येथे मोफत रोगनिदान व आयुर्वेदोपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

0
94

किशोर साहू, मौदा,ता.२ :- विलासराव देशमुख आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर राजकमल तिडके मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मौदा तर्फे आज शनिवार (दि. १ नोव्हेंबर) ला मोफत रोगनिदान व आयुर्वेदोपचार शिबिर मौदा येथे घेण्यात आला. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात स्त्री रोग, बालकांचे विकार, पंचकर्म इत्यादी सामान्य रोग संबंधी तपासणी व उपचार करण्यात आले. गावातील लोकांनी या शिबिरात येवून आपली आरोग्य तपासणी करून घेतली. याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

शिबिरात मोफत तपासणी सोबतच मोफत औषधी देण्यात आली.

या शिबिराचे आयोजन श्रीराम ग्राम विकास शिक्षण संस्थेचे सचिव प्रसन्ना (राजाभाऊ) तिडके यांच्या मार्गदर्शनात व प्रिया तिडके यांच्या उपस्थित घेण्यात आले.

मेडिकल कॉलेज चे प्राचार्य डॉ. प्रशांत डाखोळे , डॉ. सोनिया म्हात्रे, डॉ. स्वाती बजाज, डॉ. अर्चना पाटील, डॉ. अमित राठोड, डॉ. अभिजित कावळे, डॉ. चेतना काळबांडे, डॉ. मानसी जयस्वाल, डॉ. मृणाली येरणे या सर्व डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले.

सामाजिक कार्यकर्ते राजेश निनावे, विलास बावणे, धर्मराज निमजे, दिलीप शिरसाम,कल्पना मानकर, रेखा कोहाड, आशा वडवाले उपस्थित होते.