मिरची पिकाला पिकविम्यात समाविष्ट करण्यासाठी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन

0
51

किशोर साहू, मौदा, ता.३:- मौदा तालुक्यात हिरव्या मिरचीचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. सध्या या पिकावर बोकड्या रोगांसह इतरही रोगांचे प्रादुर्भाव सुरू असल्याचे शेतकरी सांगत आहेत.हिरव्या मिरचीवरील रोगराईचे प्रमाण मागील दोन वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. धान पिकाप्रमाणे, हिरव्या मिरचीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला विम्याचे कवच प्राप्त होण्यासाठी या पिकालाही पीक विम्यात समाविष्ट करण्यासाठी मौदा तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत भुरे यांच्यासह अरोली – कोदामेंढी जि प सर्कल मधील सरपंच मंडळींनी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नुकतेच निवेदन दिले.