Home Latest News रामटेक – भंडारा रोडावरील बंद पथदिवे सुरू करण्याकरता राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना...

रामटेक – भंडारा रोडावरील बंद पथदिवे सुरू करण्याकरता राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना निवेदन 

0
62

किशोर साहू, मौदा :- रामटेक – भंडारा रोडावर मौदा तालुक्यातील खात, धर्मापुरी ,कोदामेंढी ,अरोली व इतरही मोठे गावे असून या रस्त्यावर लावण्यात आलेले पथदिवे बंद आहेत. सध्या कुत्रे चावण्याच्या हैदोस संपूर्ण मौदा तालुक्यात सुरू असून या रस्त्यावरील पथदिवे सुरू करण्यासाठी मौदा तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत भुरे यांनी राज्यमंत्री एडवोकेट आशिष जयस्वाल यांना नुकतेच निवेदन दिले.

हा विषय केवळ एका गावाचा नसून महाराष्ट्रातल्या संपूर्ण नॅशनल हायवे वरच्या गावाचा आहे, राज्यमंत्री जयस्वाल यांनी हा विषय लक्षात घेऊन तात्काळ याविषयीची बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लावली व लाईट कसे सुरु करता येईल याविषयी चर्चा निवेदन देताना केली. याप्रसंगी अरोली ग्रामपंचायत सदस्य विकास समरीत व इतर नागरिक उपस्थित होते.