कामठी :- आगामी होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद च्या निवडणुकीमध्ये कामठी नगर परिषद च्या मतदारांची अंतिम यादी 31 ऑक्टोबर 2025 ला प्रसिद्ध झाली असून या निवडणुकीत 88 हजार 639 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे या मतदार यादीतून दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की लवकरच कामठी नगर पालिकेची निवडणूक होऊ घातली असून त्या दृष्टीने नगर पालिकेच्या प्रभाग रचनेचे आरक्षणाचे तसेच मतदार याद्यांची अंतिम तयारी पुर्ण झाली आहे. कामठी शहरात एकूण 17 प्रभाग झाले असून द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे 34 सदस्य व एक जनतेतून नगराध्यक्ष असे एकूण 35 जणांना निवडुन द्यायचे आहे.यासाठीची अंतिम मतदार यादी कामठी नगर परिषद ला 31 ऑक्टोबर ला प्रसिद्ध झाली आहे.
प्रभाग क्र1 मध्ये एकूण 3724 मतदार आहेत त्यामध्ये 1920 पुरुष तर -1820 स्त्री मतदार आहेत.
प्रभाग क्र 2 मध्ये 6528 मतदार आहेत ज्यामध्ये पुरुष मतदार-3171 तर स्त्री मतदार -3357 आहेत.
प्रभाग क्र 3 मध्ये 4897 मतदार आहेत ज्यामध्ये 2419 पुरुष मतदार तर 2448 स्त्री मतदार आहेत.
प्रभाग क्र 4 मध्ये 4404 मतदार आहेत ज्यामध्ये 2114 पुरूष मतदार तर 2290 स्त्री मतदार आहेत.
प्रभाग क्र 5 मध्ये 4598 मतदार आहेत ज्यामध्ये -2118 पुरुष मतदार तर 2410 स्त्री मतदार आहेत.
प्रभाग क्र 6 मध्ये 5494 मतदार आहेत ज्यामध्ये पुरुष मतदार 2629 तर 2864 स्त्री मतदार
इतर 1 आहे.
प्रभाग क्र 7 मध्ये 5950 मतदार असून 2832 पुरुष मतदार तर 3118 स्त्री मतदार आहेत.
प्रभाग क्र 8 मध्ये 6049 मतदार असून 2912 पुरुष तर 3137 स्त्री मतदार आहेत.
प्रभाग क्र 9 मध्ये 5945 मतदार असून 2856 पुरुष मतदार तर 3089 स्त्री मतदार आहेत.
प्रभाग क्र 10 मध्ये 5594 मतदार असून 2821 पुरुष मतदार तर 2773 स्त्री मतदार आहेत.
प्रभाग क्र 11 मध्ये एकूण 4720 मतदार आहेत ज्यामध्ये 2326 पुरुष मतदार तर 2393 स्त्री मतदार इतर1 मतदार आहेत
प्रभाग क्र 12 मध्ये 5390 मतदार असून पुरुष मतदार 2595 तर 2795 स्त्री मतदार आहेत.
प्रभाग क्र 13 येथे एकूण 4872 मतदारांचा समावेश असून पुरुष मतदार 2331 तर 2540 स्त्री मतदार व इतर 1 मतदार चा समावेश आहे.
प्रभाग क्र 14 येथे 5062 मतदारांचा समावेश आहे ज्यामध्ये पुरुष मतदार 2414 तर 2648 स्त्री मतदार आहेत.
प्रभाग क्र 15 येथे 5244 मतदार असून 2414 पुरुष मतदार तर 2830 स्त्री मतदार आहेत.
प्रभाग क्र 16 येथे 4448 मतदार असून 2126 पुरुष मतदार तर 2322 स्त्री मतदार आहेत.
प्रभाग क्र 17 येथे एकूण 5701 मतदारांचा समावेश असून 2724 पुरुष मतदार तर 2977 स्त्री मतदार आहेत.
कामठी नगर पालिकेच्या निवडणुकीची तयारी पुर्ण झाली असून आता सर्वांना आचार संहितेकडे तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याकडे लक्ष लागले आहे.




