spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मानस गंगा नऊ दिवशीय श्रीराम कथा अयोध्या धाम भिलगाव नागपूर तर्फे श्रीराम कथेच आयोजन आजपासून

– एक लाख आठ हजार राम नाम, लिखाण, 9 तारखेला

नागपूर :- भिलगाव नागपूरच्या वतीने श्रीराम कथेचे आयोजन 7 ते 15 नोव्हेंबर या दरम्यान तुळसा लॉन कामठी रोड भिलगाव येथे होणार आहे. या कार्यक्रमाचा मुख्य कारण म्हणजे लोकांमध्ये सांस्कृतिक भावना टिकवणे हे आहे.

विशेष म्हणजे श्रीराम कथा पंडित नंदकिशोर पांडे यांच्या वाणीतून भक्त भाविकांना एकावयास मिळणार आहे. या श्रीराम कथे दरम्यान 140 फूट लांबीच्या अगरबत्तीचे गिर गाय गोबर पासून बनलेले वजन दीड ते दोन टन आहे. ती अगरबत्ती जाळण्यात येणार असून हा राष्ट्रीय विक्रम ठरणार आहे. तर ९ नोव्हेंबर रोजी अकराशे मीटर सुती कापडावर एक लाख आठ हजार राम हे नाव लिहिण्यात येणार आहे. याप्रसंगी भिलगाव वाशी राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सकाळी दहा वाजता उपस्थिती राहतील. ही प्रक्रिया फक्त वीस मिनिटात पूर्ण करण्याचा मानस असल्याचे आयोजकांनी सांगितले. विशेष म्हणजे हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होणार असल्याचे ते बोलले. या श्रीराम कथेचा विदर्भातील रामभक्तांनी लाभ घ्यावा. असे पत्रकार परिषदेतून लतेश्वरी काळे यांनी आवाहन केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.