किशोर साहू, मौदा ,ता. १३:- रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज जगद्गुरु रामानंदचार्य दक्षिणपीठ नाणिजधाम महाराष्ट्र येथील रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज यांचा सोमवार (दि.10 नोव्हेंबर) ला नेरला (वडोदा) या गावी घेण्यात आलेल्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्यात माजी जि प सदस्य कैलास बरबटे व त्यांचे सहकारी यांनी नरेंद्र माऊली चे दर्शन व आशीर्वाद घेतले. यावेळी जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराजांनी कैलास बरबटे यांना भावी राजकीय वाटचालीस त्यांच्या गळ्यात फुलांच्या हार टाकून हार्दिक शुभेच्छा दिल्याचे बरबटे यांनी कार्यक्रमातील फोटो दाखवीत सांगितले.

या प्रसंगी माजी जि प सदस्य कैलास बरबटे,पिठ निरीक्षक लाखे, जिल्हा अध्यक्ष ढवळ,चव्हाण ,हिरा चकोले,ताराचंद भिवगडे ,राजू नागपुरे,धनराज हारोडे, मोतीराम घरझाडे,नंदू मेहर,अजय वाघमारे,राहुल मेश्राम सह समस्त संप्रदायातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








