spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या राज्य प्रसिद्ध प्रमुखपदी क्रांती शैलेश अलोने

नागपूर :- महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या कार्यात नवचैतन्य आणणारी महत्त्वपूर्ण भर म्हणून क्रांती शैलेश अलोने यांची राज्य प्रसिद्ध प्रमुख या प्रतिष्ठित पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण येथे झालेल्या भव्य आणि शिस्तबद्ध कार्यक्रमात ही नियुक्ती मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

या कार्यक्रमास महासंघाचे अध्यक्ष राजा बडे, कार्याध्यक्ष  एस. एस. कामठे, कार्याध्यक्ष गोविंद जोशी, सरचिटणीस डॉ. सुजित आर. बी. सिंह यांची उपस्थिती लाभली.

राज्यभरातील शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे प्रश्न प्रभावीपणे शासनापुढे मांडणे, संघटनेची जनसंपर्क प्रक्रिया गतिमान करणे आणि संघटित चळवळीला नवे बळ देणे या सर्व क्षेत्रांत क्रांती शैलेश अलोने यांच्या नियुक्तीमुळे महासंघाची दिशा अधिक प्रभावी आणि लक्षवेधी होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही नियुक्ती म्हणजे केवळ पदसन्मान नव्हे, तर राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या लढाईला नवी ऊर्जा देणारी एक उल्लेखनीय पायरी आहे.

Popular Articles