किशोर साहू, मौदा, ता. १६ :- मौदा नगरपंचायत चे नगराध्यक्ष पदाचे भावी उमेदवार काँग्रेसचे प्रदेश महासचिव यांनी आज मौदा तालुक्यात राजकीय भूकंप करीत कोराडी येथे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्यावर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे. मौदा येथील त्यांच्या महाविद्यालयात जाऊन माजी जि प सदस्य कैलास बरबटे, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष संजू वाघमारे ,बाबदेव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कारेमोरे, उपसरपंच धनराज हारोडे, मोतीराम घरजाळे, नंदू मेहर, किरण बरबटे सह इतरही भाजपचे पदाधिकारी व कैलास बरबटे मित्र परिवारातर्फे तिडके यांना पुष्पगुच्छ देऊन भाजप प्रवेशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
आजच भाजपा प्रवेश केलेल्या काँग्रेस प्रदेश महासचिव राजा (प्रसन्ना) तिडके यांच्यावर शुभेच्छांच्या वर्षाव









