spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मौदा नगरपंचायतचे काँग्रेसचे भावी नगराध्यक्षापदाचे उमेदवार राजा (प्रसन्ना )तिडके यांच्या आज भाजपात प्रवेश, मौदा तालुक्यात मोठा राजकीय भूकंप

किशोर साहू, मौदा, ता.१६:- मौदा नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, उद्या सोमवार (दि. 17 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या एक दिवसापूर्वीच मौदा नगरपंचायत मध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे भावी उमेदवार राजा (प्रसन्ना) तिडके यांनी आज रविवार दिनांक 16 नोव्हेंबरला महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने मोठा राजकीय भूकंप झाल्याचे संपूर्ण तालुक्यात बोलले जात आहे.

काल शनिवार दिनांक 15 नोव्हेंबरला राजा (प्रसन्ना) तिडके यांना काँग्रेस कडून मौदा नगरपंचायतची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नकारण्यात येत असल्याने ते नाराज होऊन भाजपात प्रवेश करण्याची जोरदार चर्चा तालुक्यातील गावागावात सुरू होती. मात्र आज त्यांनी भाजपात प्रवेश करून या चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे. राजा तिडके यांच्या भाजप प्रवेशामुळे मौदा नगरपंचायतच्या निवडणुकीत व येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत काँग्रेसला फटका बसतो की भाजपला फायदा होतो ? हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तालुक्यातील इतरही काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते, सरपंच मंडळी, ग्रामपंचायत सदस्यगण भाजपात प्रवेश करणार असल्याची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.याप्रसंगी माजी आमदार टेकचंद सावरकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष(रामटेक) नरेश मोटधरे, भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल,माजी तालुकाध्यक्ष चांगो तिजारे सह इतरही भाजपा पदाधिकारी व राजा तिडके यांचे समर्थक उपस्थित होते. आता भाजपच्या भावी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी राजा तिडके यांच्याही नावाची भर पडलेली आहे. उद्या सोमवार (17 नोव्हेंबर)ला चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता मौदा नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचेही लक्षवेधल्याने यंदाची निवडणूक अत्यंत रंगतदार व चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे.

Popular Articles