नागपूर :- कोराडीच्या ब्राइट स्कॉलर्स शाळेत एक दिवसीय संकाय विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नागपुर चे सुप्रसिद्ध मानव संसाधन विकास प्रशिक्षक डॉ. युगल रायलु यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षता विठाबाई बहुउद्देशीय संस्थांचे अध्यक्ष अँड भास्कर धमगाये यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून प्रशिक्षक शिशुपाल बोदिले उपस्थित होते. कार्यक्रमांच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्य डॉ. मीनाक्षी काळे यांनी पाहुन्यांच स्वागत केले आणि त्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक भाषाणात त्यांनी विद्या शास्त्र बद्दल माहिती दिली.
आपल्या उद्घाटनप्रसंगी भाषणात डॉ. युगल रायलु यांनी विद्या शास्त्रच्या वेग वेगळ्या पैलू बाबत सविस्तरपणे माहिती दिली. त्यांनी उत्तम शिक्षक कसे व्हावे याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात अँड भास्कर धामगाये यांनी शिक्षकांना आवाहन केले की त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्राच्या नविन पद्धती शिकून घ्यावे. श्री शिशुपाल बोदिले यांनी प्रक्टिक्ल्स कसं शिकवायचं हे संगितलं. सांघिक सादरी करणाच्या सत्रात शिक्षकांनी विद्या शास्त्राच्या विभिन्न पैलू वर शानदार प्रस्तुती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी रीना दुबे यांनी आभार मानले.








