spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न; पावसाळी अधिवेशनाचे 18 जुलैपर्यत कामकाज

 

मुंबईदि. ११  : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन कामकाज १८ जुलैपर्यंत होणार आहे. अधिवेशन कामकाजाच्या नियोजनासाठी आज विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक  पार पडली.

या बैठकीस विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटीलमाहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलारअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळजलसंपदा मंत्री गिरीश महाजनविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेतसेच सदस्य भास्कर जाधवनितीन राऊतजितेंद्र आव्हाडअमीन पटेलभाई जगतापप्रविण दरेकरप्रसाद लाड व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पावसाळी अधिवेशनातील कामकाजाची रूपरेषाचर्चा आणि शासकीय विधेयकांच्या मांडणीसंदर्भातील नियोजनावर चर्चा झाली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

निरंतर ध्यास’ अहवालाचे प्रकाशन

बैठकीनंतर आमदार ॲड.निरंजन डावखरे यांच्या निरंतर ध्यास’ या विशेष अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा ऐतिहासिक पराक्रम

ठाणे परिवहन सेवेतील पोलीस अधिकारी  द्वारिका भागीरथी विश्वनाथ डोखे यांनी ५४ दिवसांत माऊंट एव्हरेस्ट सर करत महाराष्ट्र पोलिस दलात इतिहास रचला आहे. ३० मार्च २०२४ रोजी त्यांनी मोहिमेला सुरुवात केली आणि २२ मे रोजी जगाच्या सर्वोच्च शिखरावर भारताचा तिरंगा फडकवला.  डोखे या महाराष्ट्र पोलीस दलातील माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. विशेष म्हणजेमाउंट एव्हरेस्टवर भारताचे राष्ट्रगीत जन गण मन’ सादर करणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला गिर्यारोहक ठरल्या आहेत. यासोबतच त्यांनी जगातील चौथ्या क्रमांकाच्या उंच शिखर असलेल्या माऊंट ल्होत्से’ (८५१६ मीटर) देखील यशस्वी सर केला आहे.

आई-वडीलांच्या स्मृतीस वेगळ्या प्रकारे श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने त्यांनी ही धाडसी मोहीम स्वीकारली होती. त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या शौर्यधैर्य आणि नारीशक्तीचे प्रतीक म्हणून त्यांचं कौतुक मान्यवरांनी केले..

इंग्लिश खाडी पार करणाऱ्या ठाण्यातील जलतरणपटूंचा ऐतिहासिक पराक्रम

ठाणे जिल्हा अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅक्वाटिक असोसिएशनच्या तीन जलतरणपटूंनी अलीकडेच इंग्लंड ते फ्रान्स दरम्यानची ४६ कि.मी. अंतराची इंग्लिश खाडी यशस्वीरित्या पार केली. मानव राजेश मोरे याने १३ तास ३७ मिनिटांत, आयुष प्रवीण तावडे आणि आयुषी कैलाश आखाडे यांनी ११ तास १९ मिनिटांत ही मोहीम यशस्वी केली.

विशेष उल्लेखनीय म्हणजेरेयांश दीपक खमकर या अवघ्या सहा वर्षांच्या बालकाने तब्बल १५ कि.मी. अंतर पोहत पार करत देशात विक्रम केला. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये झाली असून त्याचाही यथोचित मान्यवरांनी  गौरव  केला.

या सर्व यशस्वी व्यक्तींचा  मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.