मुंबई १४ : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांसाठी ८ जुलै रोजी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत निमा स्टुडन्ट फोरम महाराष्ट्र राज्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर ३ उमेदवार निवडुन आनण्यात यश आले. यांपैकी एकजण अधिसभेवर (सिनेट) डॉ. निखिल महाजन, दूसरा विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष पदी डॉ. आदर्श नलावडे तर तिसरा विद्यार्थी परिषद संयुक्त सचिव पदी डॉ. भूषण औसरमले निवडून आला. या तिन्ही उमेदवारांना हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई) यांनी मुंबई येथे बोलवून घेतले. व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व खा.सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीं) आमदार चंद्रकांत नवघरे पाटील (वसमत विधानसभा) यांच्यासह तीनही उमेदवारांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित रंजन दादा ठाकरे (सभापती- नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ) डॉ.सागर कारंडे (वेब कन्व्हेनर निमा महाराष्ट्र राज्य) डॉ.संकेत झाडे (अध्यक्ष-निमा स्टूडेंट फोरम महाराष्ट्र) डॉ.कृष्णा चालगे (सचिव -निमा स्टूडेंट फोरम महाराष्ट्र) डॉ. योगेश उदगीकर (कोषाद्यक्ष-निमा स्टूडेंट फोरम महाराष्ट्र) यांचे सुद्धा मंत्री महोदयांनी निवडणुक कार्याबद्दल कौतुक व अभिनंदन करुन निमा केंद्रिय शाखा, निमा महाराष्ट्र शाखा यांनी सुद्धा निमा स्टूडेंट फोरम महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय शाखेच्या लिस्ट मधील सर्व विद्यार्थी यांनी निवडणुकी साठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन ही निवडणूक नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन केंद्रीय अध्यक्ष डॉ.आशुतोष कुलकर्णी, माजी केंद्रीय अध्यक्ष टेम्भूर्णीकर, केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. शैलेश निकम, डॉ. गजानन पडघन, केंद्रीय कोषाध्यक्ष डॉ. शांतिलाल शर्मा, निमा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. राजु ताटेवार, सचिव डॉ. प्रशांत देशमुख, कोशाध्यक्ष डॉ. सोपान खर्चे तसेच निमा संघटनेचे राज्याचे डॉ. सागर कारंडे, डॉ. श्रीराम रगड, डॉ. पवन सोनवणे, डॉ. विष्णू बावणे, डॉ.देवेंद्र बचाव, निमा स्टुडंन्ट फोरम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संकेत झाडे, सचिव डॉ. कृष्णा चालगे, कोषाध्यक्ष डॉ. योगेश उडगिकर, अमिर कोटनाळ (सोलापूर) डॉ. सदाकांत राठोड (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी रित्या जिंकलो त्याबद्द्ल सर्वांचे आभार मानले.




