कन्हान १४ : दिनांक १२/०७/२०२५ चे २३:०० वा. ते दिनांक १३/०७/२०२५ चे ०५:०० वा. दरम्यान जिल्हा गस्त मध्ये संतोष गायकवाड, उपविभागिय पोलीस अधिकारी, कन्हान उपविभाग यांनी संपुर्ण जिल्हयात सतर्कपणे गस्त केली. तसेच कन्हान उपविभागातील पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत शिवनगर, फुकटनगर, खादान कं ३ परीसर आणि संताजी नगर येथे संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वात पायदळ पेट्रोलींग करून कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर वेळी पोलीस स्टेशन कन्हान येथील अधिकारी अंमलदार आणि दंगा नियत्रंण पथक चे पोलीस अंमलदार हजर होते. कोबिंग ऑपरेशन राबवुन रेकॉर्डवरील गुन्हेगार, जेल रिलीज गुन्हेगार, निगराणी बदमाश तसेच अवैध दारू विक्रेते गुन्हेगार चेक करून त्यांचे घराची पंचासमक्ष घरझडती घेण्यात आली. गांधी चौक, कन्हान येथे नाकाबंदी करून संशयीत वाहनांची तपासणी करण्यात आली.
Home Latest News रात्र गस्त दरम्यान कोबींग ऑपरेशन राबवुन केले रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक आणि नाकाबंदी...



