मौदा १४ :- पोलीस स्टेशन मौदा येथे फिर्यादी नामे यश सुरेश पाटील, रा.
तळगाव, ता. राधानगरी, जि. कोल्हापुर ह.मु. मथनी मौदा यांच्या रिपोर्टवरून कलम ३०३(२) भा.न्या.सं अन्वये गुन्हा नोंद आहे. सदर गुन्हयाची हकीकत अशा प्रकारे आहे की, दिनांक ०४/०७/२०२५ रोजी चे रात्री ११:०० वा. ते दिनांक ०५/०७/२०२५ चे सकाळी ०६:४५ वाजेच्या सुमारास फिर्यादी यांची मोटार सायकल क्र. एम एच ०९ एफ आर २६३९ आणि त्यांचे शेजारी प्रभाकर मेश्राम यांची मोटार सायकल क्र. एम एच ४० बी.यु ५२३८ अशी वाहने कोणीतरी अज्ञात चोराट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून वरील प्रमाणे गुन्हा आहे.
दिनांक १२/०७/२०२५ रोजी आरोपीची गुन्हा करण्याची पध्दत आणि गुप्त बातमीदाराच्या माहीतीच्या आधारे मौदा पोलीसांनी आरोपी कं १ नामे किसन उर्फ किष्णा शिवा बागडे, वय. ३८ वर्ष, रा. चांदोरी, ता.जि. भंडारा आणि आरोपी कं २. करण उर्फ पांडे रोशन पाटील, वय २५ वर्षे, रा भिमसेना नगर झोपडपट्टी, जरीपटका ता. जि. नागपुर यांना ताब्यात घेवून त्याला गुन्हया संदर्भात विचारपुस केली असता दोघांनी मिळुन नमुद गुन्हा केल्याचे कबुल केले. दोन्ही आरोपीतांना गुन्हयाच्या तपासकामी दिनांक १२/०७/२०२५ रोजी अटक करण्यात आलेले आहे. नमुद आरोपीतांच्या ताब्यातुन मोटार सायकल क्र. एम एच ०९ एफ आर २६३९ किंमती ८०,०००/- रूपये आणि मोटार सायकल क्रं. एम एच ४० बी.यु ५२३८ किंमती ४०,०००/- रूपये असा एकुण १,२०,००० /- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चोरीचा गुन्हा उघड, चोरीस गेलेल्या २ मोटर सायकल जप्त, २ आरोपी अटक, मौदा पोलीसांची कामगिरी


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



