spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी प्रवेशिकांना 19 जुलै 2025 पर्यंत मुदतवाढ  

नवी दिल्ली, १४  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिताउत्कृष्ट लेखनउत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथाउत्कृष्ट छायाचित्रणसमाज माध्यम आणि स्वच्छता अभियान जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखनछायाचित्रे आणि वृत्तकथांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत  आता 19 जुलै 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

या पुरस्कार स्पर्धेसाठी अर्जाचे नमुने आणि माहितीपत्रक शासनाच्या महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. राज्यातील स्पर्धकांनी आपल्या संबंधित जिल्हा माहिती कार्यालयामार्फततर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील इच्छुकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयतळमजलाहुतात्मा राजगुरु चौकमादाम कामा मार्गमंत्रालयमुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करावेत.

दिल्लीतील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात सादर कराव्यात. राज्य शासनामार्फत एकूण 20 पुरस्कार प्रदान केले जातीलयामध्ये राष्ट्रीय स्तरावरील, 11 राज्य स्तरावरील आणि विभागीय स्तरावरील पुरस्कारांचा समावेश आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या उत्कृष्ट साहित्याच्या प्रवेशिका निर्धारित मुदतीत सादर कराव्यातअसे आवाहन महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक(मा.) मनिषा पिंगळे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.