नागपूर १५ : क्रांतीवीर नारायणसींह उईके यांची 104 वी जयंती बिरसामुंडा आदिवासी कल्याण महासंघा च्यावतीने नुकत्याच झालेल्या जयंती निमित्ताने आदर्श नगर, दिघोरी, उमरेड रोड, नागपूर येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भाऊ खुरसंगे यांनी भुषविले तर, प्रमुख पाहूणे आदिवासी सेवक रमेश उईके प्रामुख्याने उपस्थित होते. कांतीवीर नारायणसींह उईके यांच्या प्रतिमेला उपस्थितांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. प्रमुख पाहुणे आदिवासी सेवक रमेश उईके यांनी आपले विचार व्यक्त करतांनी म्हणाले की, कांतीवीर नारायणसींह उईके यांनी 12 वर्ष आमदार म्हणून कांतीकारी कार्य केले. त्याकाळी देवरी, गोंदिया, सिरोचा, एटापल्ली, आलापल्ली, गडचिरोली, मेळघाट धारणी भागात राहणा-या आदिवासींना आदिवासी म्हणून ओळखल्या जात होते. विदर्भातील अन्य भागात वास्तव्य करून राहणा-या आदिवासींना आदिवासींचा दर्जा देण्यात आला नव्हता. क्षेत्र बंधन हटविण्याचे महान कार्य क्रांतीवीर नारारयणसींह उईके यांनी आपल्या आमदारकीच्या काळात करून आदिवासींना न्याय मिळवून दिला. त्यामुळे सर्व आदिवासींना जातीचे प्रमाणपत्र. मिळणे सहज शक्य झाले. भाऊ खुरसंगे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले. नारायणसींह उईके यांच्या नेतृत्वामुळे आदिवासी झुडपी जमीन कसणा-या आदिवासींना जमिनीचे पटटे मिळाले. लाखोच्या मोर्चाला प्रबोधन करत असतांना आदिवासी बांधवांनी एकमेकास “जयसेवा” संबोधावे असा मुलमंत्र त्यांनी दिला. कार्यक्रमाला प्रामुख्याने सर्वश्री प्रदीप धुर्वे, ऊमाजी सुरपाम, राजेश पेंदाम, सौ. प्रभा खुरसंगे, स्वाती खुरसंगे, पुजा मसराम, नितीन मसराम, रमेश उईके, मुकेश खुरसंगे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सदाशिव सुरपाम यांनी तर आभार चारूलता उईके यांनी मानले.


