spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धनुर्विद्या खेळात श्वेता कोवे हिची आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगीरी

गडचिरोली :- महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली द्वारा खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र, आष्टी येथील महात्मा ज्योतीबा फुले कनिष्ठ महाविद्यालय, आष्टी ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे बी.ए. प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेली खेळाडू श्वेता मंजु भास्कर कोवे, रा. कढोली ता. चामोर्शी जि. गडचिरोली ही खेळाडू वर्ग 8 वी पासून धनुर्विद्या या खेळाचा नियमित सराव करीत आहे. सद्यस्थित सदर खेळाडूचा सराव हा खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र आष्टी या ठिकाणी सुरु असून त्यांचे प्रशिक्षक प्रा. डॉ. श्याम कोरडे हे त्यांना तांत्रिक प्रशिक्षण देत आहेत.

सदर खेळाडूने एशियन युथ पॅरा गेम्स दुबई येथे दि. 08 ते 12 डिसेंबर 2025 या कालावधीत संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत धनुर्विद्या (कंपाऊंड राऊंड) या प्रकारामध्ये वैयक्तीक सुवर्णपदक व सांघिक कांस्यपदक संपादन करुन जिल्ह्याचे, राज्याचे व देशाचे नाव लौकीक केले आहे. या खेळाडूची कामगीरी जिल्ह्यासाठी इतर खेळाडूंना प्रेरणादायी ठरेल. तिच्या या उल्लेखनिय कामगीरीबद्दल जिल्ह्यात विविध स्तरावरुन कौतुक होत असून विविध स्तरावरुन गौरविण्यात आले आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, (भा.प्र.से.) व जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांनी जिल्हा प्रशासनाच्या व क्रीडा विभागाच्या वतीने सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन खेळाडूचा गौरव करण्यात आलेला आहे व भविष्यातील उत्तम कामगीरी करीता सुभेच्छा दिल्या, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली हे कळवितात.

Popular Articles