spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत तोंडलीला घवघवीत यश प्राप्त

किशोर साहू, मौदा :- विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी दरवर्षी विविध स्तरांवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी सुद्धा केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025 -26 चे आयोजन जि. प. शाळा,धानोली येथे करण्यात आले होते. केंद्रातील आठ शाळांनी यामध्ये विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली विविध खेळांमध्ये भाग नोंदवत अव्वल ठरली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडलीतील मुले कबड्डी कनिष्ठ गट प्रथम क्रमांक, मुली लंगडी कनिष्ठ गट प्रथम क्रमांक, मुली कबड्डी कनिष्ठ गट द्वितीय क्रमांक, 100 मीटर धावणे मुले भावेश लखन तिजारे, मुली आस्था मोरेश्वर ईश्वरकर प्रथम क्रमांक, वेशभूषा स्पर्धेत वंशिका सुरेंद्र बाभरे प्रथम क्रमांक मिळवला. अभ्यास असो अथवा क्रीडा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम तोंडलीच्या विद्यार्थ्यांचा उत्साह व यश बघून पालक, शिक्षक, गावकरी यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. तसेच तालुकास्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Popular Articles