spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्र भूषण राम सुतार श्रद्धांजली सभेचे आज दिल्लीत आयोजन

नवी दिल्ली :- जागतिक किर्तीचे शिल्पकार, महाराष्ट्र भूषण डॉ. राम वनजी सुतार यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज (दि.२७ डिसेंबर) सभेचे आयोजन करण्यात आले आहे. भीम ऑडिटोरियम, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, १५ जनपथ, नवी दिल्ली येथे दुपारी ३ ते ५ या दरमयान ही श्रघ्दांजली सभा होणार आहे.

डॉ. सुतार यांचे गेल्या आठवड्यात १८ डिसेंबर रोजी निधन झाले होते. सात दशकांहून अधिक कारकीर्दीत त्यांनी शेकडो पुतळ्यांची निर्मिती केली. जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून गौरविल्या जाणा-या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांची शिल्पे त्यांनी साकारली आहेत. त्यांच्या रचना भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे अमर प्रतीक बनल्या आहेत. या सभेस कुटुंबीय, चाहते आणि कला प्रेमी उपस्थित राहणार आहेत असे श्री अनिल राम सुतार यांनी कळविले आहे.

Popular Articles