काटोल :- पोस्टे काटोल येथील अपराध क्रमांक १८५/२०२४ कलम ३२६ भादंवी व अप. क्र. २९४/२३ कलम ३३६, ५०४, ५०६ भादंवि., कलमवाढ ३२४ भांदवि मधील पाहिजे असलेला आरोपी नामे योगेश पांडुरंग निकाजू, वय ३६ वर्ष, रा. जुना सरकारी दवाखाना, कबाडी मोहल्ला पांढुर्णा याचेविरूद्ध मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आला होता. सदर आरोपी हा सन २०२३ पासुन नमुद गुन्हयात फरार असल्याने त्याचा शोध काटोल पोलीस घेत असता दिनांक २६/१२/२०२५ रोजी काटोल पोलीसांना गोपनीय बातमी दारां कडून महिती मिळाली की, नमुद आरोपी हा पोलीस स्टेशन काटोल हद्दीत आपले सासुरवाडी येथे राहत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी हा घरी हजर मिळुन आला. सदर आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदर आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरून सदर गुन्हयात आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीला अटक करण्यात आली आहे.








