मनपातर्फे डॉ. पंजाबराव देशमुख यांना विनम्र अभिवादन

0
59

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे देशाचे पहिले कृषिमंत्री शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना जयंती दिनानिमित्त (ता.27) विनम्र अभिवादन करण्यात आले.

मनपा मुख्यालयात असणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहायक आयुक्त श्याम कापसे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, मनीष डूमरे, मनपाच्या जनसंपर्क विभागाचे प्रवीण वानखेडे, शैलेश जांभुळकर यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय मनपातर्फे कृषी महाविद्यालय येथील डॉ. पंजाबराव देखमुख यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच शुक्रवारी गुरु गोविंद सिंहजी यांचे साहिबजादे बाबा जोरावर सिंह व फतेह सिंहजी यांच्या बलिदान दिनानिमित्त वीर बाल दिवसाचे औचित्य साधून मनपातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.