spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आज ०५ नामनिर्देशन पत्र दाखल,२५१ नामनिर्देशन पत्रांची उचल  

– ०२ दिवस शिल्लक

चंद्रपूर :- चंद्रपुर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ०५ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. शनिवार २७ डिसेंबर २०२५ रोजी २५१ नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली.

दाखल झालेल्या ०५ अर्जात प्रभाग क्रमांक १ (क) मधून कुसुम देविदास उदार यांनी जाणता राजा पक्षातर्फे, प्रभाग क्रमांक ३ (क) मध्ये अग्रवाल सुनीता सुभाषबाबू यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे,प्रभाग क्रमांक ३ (अ) मध्ये मोरेश्वर भागवत गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षातर्फे, प्रभाग क्रमांक १०(क) मध्ये कासट दिपा ललित यांनी भारतीय जनता पक्षातर्फे, प्रभाग क्र. ११(ड) मधून शेख सलीम शेख कादर यांनी अपक्ष म्हणुन अर्ज सादर केला आहे.

मनपा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ५ कार्यालये मिळुन एकुण १३९ इच्छूकांनी २५१ नामनिर्देशन पत्रांची उचल केली. नामनिर्देशन पत्रे ही केवळ प्रत्यक्षरित्याच (ऑफलाईन) सादर करता येत आहेत. ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार) हा नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस राहणार आहे.

२३ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत तर ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.उद्या रविवार २८ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही,त्यामुळे नामनिर्देशन दाखल करण्यास सोमवार २९ डिसेंबर व मंगळवार ३० डिसेंबर असा दोनच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

केंद्रनिहाय अर्जाची संख्या पुढीलप्रमाणे –

१.निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ – (प्रभाग क्र. १,२ व ५) – २९ इच्छुकांद्वारे ५० अर्जांची उचल,०१ अर्ज दाखल

२.निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक २ -(प्रभाग क्र. ३,४ व ६) – १८ इच्छुकांद्वारे ३७ अर्जांची उचल,०२ अर्ज दाखल

३.निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ३ – (प्रभाग क्र. ७,८ व ९) – २१ इच्छुकांद्वारे ३७ अर्जांची उचल

४.निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ४ – (प्रभाग क्र. १०,११,१२ व १५) – ३६ इच्छुकांद्वारे ६०, अर्जांची उचल, ०२ अर्ज दाखल

५.निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ५ – ( प्रभाग क्र. १३,१४,१६ व १७) – ३५ इच्छुकांद्वारे ६७ अर्जांची उचल


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.