Home Latest News राज्यस्तरीय उपवर युवक-युवती परिचय मेळावा व पुस्तिका प्रकाशन सोहळयाला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यस्तरीय उपवर युवक-युवती परिचय मेळावा व पुस्तिका प्रकाशन सोहळयाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
68

नागपूर :- महात्मा फुले शिक्षण संस्था रेशिमबाग नागपूर येथे सर्व शाखीय माळी समाजाचा परिचय मेळावा गुरुवारी साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले, कांती ज्योती सावित्री आई फुले, यांच्या पुतळयांना माल्यार्पण व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. या मेळाव्यात एकूण १४५९ उपवर युवक व युवती यांच्या नावांची नोंद व विमोचन केल्या गेलेल्या “योगायोग” या पुस्तिकेत करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अरुण पवार, प्रमुख पाहुणे व वक्ते शरदराव निंबाळकर, माजी कुलगुरु पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला प्रमुख उपस्थिती अशोकराव मानकर, माजी आमदार विधान परिषद, महाराष्ट्र राज्य उपस्थित होते. यावेळी योगायोग पुस्तिकेमध्ये गावखेड्यामधून नोदंणी करणारे प्रतिनिधी यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना उपवर वर वधू परिचय मेळावा समितीचे संयोजक व संस्थेचे संचालक सुनिल चिमोटे व कार्यक्रमाचे संचालन माया जोगे यांनी तर आभार प्रदर्शन सह-संयोजक शरद चांदोरे यांनी केले.

या प्रसंगी योगायोग परिचय मेळाव्यामध्ये युवक- युवतीनी स्टेजवरुन परिचय दिला. कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश देवते, उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे, सरचिटणीस रविंन्द्र अंबाडकर, सहचिटणीस रमेश राऊत, कोषाध्यक्ष प्रा. मुकेश घोळसे, सह-संयोजक शरद चांदोरे, अजय गाडगे, धनराज फरकाडे, राजू गाडगे तसेच संचालक राजेंद्र पाटील, मोहीत श्रीखंडे, डॉ.प्रा. अभिजीत पोतले, नंदू कन्हेर, प्रा.पंकज कुरळकर, देवेंद्र काटे, डॉ. अल्का झाडे व मोठ्या प्रमाणात समाज बांधव व परिचय देण्याकरिता युवक-युवती प्रामुख्याने उपस्थित होते.