spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लोकजन शक्ती पार्टी स्वबळावर तर काही ठिकाणी महायुती सोबत राहणार – प्रमोद कुदळे प्रदेशाध्यक्ष

नागपूर :- लोकजन शक्ती पार्टी रामबिलास या पक्षाचा शनिवारी 27 डिसेंबर रोजी विदर्भ हिंदी साहित्य भवन नागपूर येथे विदर्भ विभागीय स्तरावरील मेळावा नुकताच संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लोक जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे होते. सदर मेळाव्यात महानगरपालिका जिल्हा परिषद व इतर निवडणुका भाजपा व मित्र पक्षाबरोबर युती करून लढवणार असून राज्यात काही ठिकाणी पक्षाचे पुरस्कृत उमेदवार उभे केले असून काही ठिकाणी मित्रपक्ष असलेल्या भाजपा शिवसेना राष्ट्रवादी यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण लढत करणार असून इतर ठिकाणी मात्र युती सोबत राहणार आहे. महायुतीच्या उमेदवारांना इतर ठिकाणी पाठिंबा देणार असून महायुतीच्या नेत्यांनी निवडणुका झाल्यानंतर मात्र राज्यस्तरीय कमिटीवर लोकजन शक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना सहानुभूतीपूर्वक कमिटीत सामावून घेतले पाहिजे. बिहारमध्ये ज्या प्रमाणे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्ष एक दिलाने निवडणुका लढवल्याने विरोधी पक्षाला निष्ठाभूत केले त्याप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा महायुतीला ग्रामीण व शहरी भागातून चांगला प्रतिसाद असून महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीत एनडीएचे मित्रपक्ष हद्दपार करतील असे वाटते.

महाराष्ट्रातील जनतेला महायुतीशिवाय पर्याय राहणार नाही. असे प्रतिपादन लोकजन शक्ती पार्टी रामविलास प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना प्रमोद कुदळे यांनी सांगितले की, विदर्भातील यापूर्वीची सर्व कार्यकर्त्यांनी बरखास्त करण्यात आले असून पक्षाने नव्या नेतृत्वांना संधी देण्याचा प्रयत्न केला असून पूर्व विदर्भातून एड. बम श्रीकृष्ण व पश्चिम विभागाची जबाबदारी पंकज मनोहरे यांना देण्यात आले असून नागपूर विभाग हा बबलू कडबे यांना प्रभारी म्हणून नेमण्यात आले असून यापुढे जिल्हा जिल्ह्यामध्ये जुन्या नव्या कार्यकर्त्यांना घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतील. यासाठी महाराष्ट्रामध्ये पक्ष बळकट होण्यासाठी बिहारच्या मंत्र्यांना व आमदारांना तसेच खासदारांना विभागीय मेळाव्यामध्ये आमंत्रित करण्यात येणार असून त्यामुळे पक्ष संघटन प्रचंड स्वरूपामुळे मजबूत होईल. अशी आशा पत्रपरिषदेत व्यक्ती केली. या विभागीय मेळाव्यास महासचिव प्रा.अशोक गायकवाड, तुषार मोहोळ, विजय मालवणकर तसेच तन्हा नागपूरी दलित मित्र यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तसेच पंकज मनोहरे शक्ती खत्री, मनोज शिंदे, प्रभुदास दांडरा व इतर मान्यवर उपस्थित होते. आयोजक बबलू कडबे यांनी प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.

Popular Articles