spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा नगरपरिषदेत भाजपचे वर्चस्व; गटनेतेपदी जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने यांची सर्वानुमते निवड

– ज्येष्ठ नेते अ‍ॅड. कैलास भुरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया संपन्न; नवनिर्वाचित नगराध्यक्षा व २३ नगरसेवकांची उपस्थिती

हंसराज प्रतिनिधी,भंडारा :- भंडारा नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदासह २३ जागा जिंकून अभूतपूर्व यश संपादन केल्यानंतर, आज ३० डिसेंबर २०२५ रोजी भाजप गटनेतेपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये जिल्ह्याचे नेतृत्व करणारे आणि भाजप जिल्हाध्यक्ष आशु भाऊ गोंडाने यांची सर्वानुमते गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे नगरपरिषदेत भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून विकासाच्या राजकारणाला नवी गती मिळण्याची चिन्हे आहेत.

अ‍ॅड. कैलास भुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

नगरपरिषदेतील भारतीय जनता पार्टी गटाच्या निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे अध्यक्षपद भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. कैलास भुरे यांनी भूषविले. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा मधुरा मदनकर यांच्यासह भाजपचे सर्व २३ नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत सर्व नगरसेवकांनी आशु गोंडाने यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

नवनिर्वाचित नगराध्यक्षा मधुरा मदनकर आणि गटनेते आशु भाऊ गोंडाने यांच्या नेतृत्वात भंडारा शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प यावेळी करण्यात आला. भाजपच्या विजयामुळे जनतेला असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे नवे नेतृत्व सक्षमपणे काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या नवनिर्वाचित नगरसेवकांची होती उपस्थिती

या महत्त्वपूर्ण बैठकीला भाग्यश्री कळंबे, चंद्रकला भोपे, कुलप्रीत कवलजितसिंग चड्डा, भगवान देवराव बावनकर, रिता शैलेश मेश्राम, शिवशंकर माणिक आजबले, प्रिया शैलेश खरोले, आशा हरिश्चंद्र उईके, निमिश डोकरीमारे, वृषाली अजय ब्राह्मणकर, रूपाली रवींद्र नेवारे, नितीन गायधने, सचिन घनमारे, प्रीती अविनाश ब्राह्मणकर, राजकुमार व्यास, आशिष राधेश्याम गोंडाने, प्रीती ईश्वरीलाल गाढवे, मंगेश वंजारी, बल्ली, अल्फिया अमीर शेख, हरिश्चंद्र मडावी, ललितकुमार जांभुळकर आणि ज्योती हरीश मोगरे या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची उपस्थिती होती.

आशु गोंडाने यांच्या निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला असून, शहराच्या प्रलंबित प्रश्नांची तड लावण्यासाठी हे सक्षम संघटन काम करेल, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.