कन्हान येथे २०८ वा ‘भीमा-कोरेगाव शौर्य दिन’ उत्साहाने साजरा

0
40

कन्हान :- स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका त १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव विजय स्तंभाचा २०८ वा वर्धापन दिन ‘शौर्य दिन’ म्हणुन अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने मोठ्या संख्येने आंबेडकरवादी अनुयायांनी एकत्र येत वीर योद्ध्यांच्या शौर्याला अभिवादन केले.

गौरवशाली कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणुन कन्हान पोलीस निरिक्षक वैजयंती मंडवधरे व कन्हान नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण आणि पुष्पहार अर्पण करून सुरूवात करण्यात आली. उपस्थित जनसमुदायाने दिलेल्या ‘जय भीम’ च्या घोषणांनी संपुर्ण परिसर दुमदुमून गेला होता. हा कार्यक्रम रिपब्लिकन सांस्कृतिक संघचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करून प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनात भीमा-कोरेगावचा इतिहास हा स्वाभिमान आणि न्यायाचा विजय असल्याचे सांगितले.

याप्रसंगी कन्हान नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसे विका आणि शहरातील मान्यवर नागरिक बहु संख्येने उपस्थित होते. समाजातील विविध स्तरांतील लोकांनी विजय स्तंभाच्या शौर्याचे स्मरण करित मानवंदना दिली. शेवटी समाजसेवक मनोज गोंडाणे हयांनी उप स्थित सर्व अतिथी, पोलीस प्रशासन आणि नागरिकांचे आभार मानले. कार्यक्रमांचे रिपब्लिकन सांस्कृतिक संघ, महाराष्ट्र प्रदेशचे प्रसिद्धी प्रमुख नितीन मेश्राम यांनी नियोजन करून यशस्वितेकरिता राजेश फुलझे ले, आनंद चव्हाण, रुपेश मेश्राम, दिवाळु मेश्राम, रोशन मेश्राम आदी सह कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.