– 10 जानेवारी पर्यत जिल्हा पुरवठा कार्यालयात नोंदणी करावी
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्काविषयी व्यापक स्वरुपात जनजागृती व्हावी या करीता दिनांक १२ जानेवारी रोजी दुपारी १२:०० वाजता १६ ते २१ वर्ष वयोगटातील विदयाथ्यांकरीता ग्राहक संरक्षण कायदा २०१९ या विषयावर सामाजिक न्याय भवन भंडारा येथे वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असुन या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त होणा-या विदयार्थ्यांला रुपये ११००/- व्दितीय क्रमांक प्राप्त होणा-या विदयार्थ्यांला रुपये ७००/- व तृतिय क्रमांक प्राप्त होणा-या विदयार्थ्यांला रुपये ५००/- चे पारीतोषिक तसेच वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होणा-या प्रत्येक विदयार्थ्यांना प्रोत्साहन पर प्रमाणपत्र जिल्हा प्रशासनाकडुन देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणा-या विदयार्थ्यांनी दिनांक १० जानेवारी २०२६ पर्यंत dsobhandarad@gmail.com या E-mail address वर mail करावे किंवा प्रत्यक्ष जिल्हा पुरवठा कार्यालयात येवुन नाव नोंदणी करावे तसेच नंदगोपाल फाउंडेशन भंडारा तर्फे रक्तदान शिबीर सुध्दा आयोजित करण्यात आले आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद भंडारा विभागानी कळविले आहे.



