नागपूर :- शिक्षणाची दारे तर बंद होतीच अ ब क शब्द हि कानात पडले तर कानात गरम तेल होते कलम नाही कागद नाही जमिनीची पढा काडीची लेखनी शिक्षणाच्या विचारही केला तर शेन मातीच्या वर्षाव असा कशा परिस्थितीतून शिक्षणाची वाट तुडवत फुले दांपत्यानी साहस करून कोट्यवधी रंजल्या गांजलेल्या रयतेच्या डोक्यात शिक्षणाचे बीजारोपण करून सन्मानाच्या धडा शिकवला हे मोलाचं कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या पानावर उतरवले नसते तर शैक्षणिक चळवळीचे काय झाले असते असे मार्मिक भाष्य कवी तन्हा नागपुरी यांनी केले ते आज आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षास्थानावरू बोलत होते प्रथम रोशन बारमासे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले तर जयदेव चिंवडे यांनी दिपप्रज्वलन केले ओबीसी नेते राजू दादा पांजरे. देवेंद्र बागडे यांनी महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या जिवन चत्रिरावर प्रकाश टाकला. धर्माजी बागडे यांनी सावित्रीबाई फुले अमर रहे या घोषवाक्याने संपूर्ण परिसर दणाणून सोडले. यावेळी संचालन प्रा.रमेश दुपारे यांनी तर आभार हंसराज उरकुडे यांनी मानले. याप्रसंगी आंरिमोचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक धोरण संविधानाच्या पानावर आले म्हणून फुले दांपत्याचा कार्याचे सोनं झाले – कवि तन्हा नागपुरी









