spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खांबा PHC येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

हंसराज प्रतिनिधी,भंडारा साकोली :- साकोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खांबा येथे ३ जानेवारी रोजी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात डॉ. पवन फुंडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत महिलांच्या शिक्षणाचे व सक्षमीकरणाचे महत्त्व सांगितले. तसेच महिला मुक्ती दिन व बालिका दिनाच्या निमित्ताने महिलांनी स्वतः सक्षम होण्यासोबतच आपल्या लहान मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी भेंडारकर, सचिन रिनाईत, निलेश मेश्राम, निखिल कठाणे, श्रीकांत पुसाम, गुरुदास डोंगरवार तसेच महिला कर्मचारी ज्योती जांभुळकर, सीमा राणे आदी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Popular Articles