spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शौर्यदिवस आणि सावित्रीबाई फुले जयंती साजरी, भीमगीत कव्वालिचे विशेष आयोजन

खापा :- १ जानेवारी शौर्य दिन व ३ जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने सामाजिक प्रबोधन व कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन ३ जानेवारी २०२६ रोजी फुटबॉल ग्राउंड, गुमगाव माईन, खापा येथे भीम आर्मी ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गुमागाव खान प्रबंधक उमेश चरपे, खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे, न. प. खापा नगराध्यक्ष पियुष बुरडे, नगरसेवक तथा अध्यक्ष समता सांस्कृतिक मंडळ नामदेव गजभिये उपस्थित होते. तसेच समता सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष रविंद्र डोंगरे यांची कार्यक्रमास उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. दीपप्रज्वलन ठाणेदार भुजाडे तसेच समता सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष रविंद्र डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.

विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राचे कवी व गीतकार प्रणय सतलज तसेच नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते शशांक उपारे उपस्थित होते. कार्यक्रमात सूफी गायक कव्वाल फैजान ताज यांनी भीम गीत, कव्वाली सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भीम आर्मी ग्रुपच्या सदस्यांकडून करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला.

Popular Articles