spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गोतस्करांची अमानवी कृत्ये उघड :मौदा हायवेवर गोमातेला रस्त्याच्या कडेला फेकले, राष्ट्रीय बजरंग दलाचा तात्काळ हस्तक्षेप

किशोर साहू, मौदा,ता.५:- गोपाल कंपनी, हायवे रोड, मौदा येथे मिळालेल्या माहितीनुसार काही गोतस्करांनी गोमातेला रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना शनिवार (दि. 3 जानेवारी ) ला सायं. 6 वाजता दरम्यान घडली. ही माहिती मिळताच राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

यामध्ये हिमांशु वडे, प्रदीप शेंडे, अंकित कोसरे, अश्विन बाबरे, पवन भोजने, अवि क्षिरसागर, वंश वडे, कुणाल बावणे,तुषार खेडेकर, अंकुश मानकर व यश वडे यांनी पुढाकार घेतला.

संबंधित घटनेची पोलीस स्टेशनला माहिती देऊन सखोल चौकशीची मागणी करण्यात आली, तसेच गोमातेचा विधीपूर्वक अंतिम संस्कार करण्यात आला.या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.