किशोर साहू, मौदा, ता.५ :- पीएम श्री उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे पालक सभा, माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे, प्रमुख पाहुणे गट ग्रामपंचायत दहेगाव उपसरपंच रवींद्र ढोमणे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रणधीर आंबिलढुके, विशेष अतिथी म्हणून माजी उपसरपंच संदीप आबिलढुके, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंत आंबिलढुके, शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व सदस्य, सदस्या, गट ग्रामपंचायत दहेगाव येथील सर्व सदस्य, , सदस्या तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून पालक सभा आणि विद्यार्थी मेळावा का घेण्यात येत आहे याची पार्श्वभूमी सर्व पालकांना सांगितली. पालक सभेत सर्व पालकांनी आपल्या शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण कसे मिळेल? आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल? आणि आपली शाळा तालुक्यात आणि जिल्ह्यांमध्ये कश्याप्रकारे अग्रेसर होईल याबाबतीत सविस्तर चर्चा केली. पुढील शैक्षणिक सत्रात पीएम श्री जि प उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथील नवोदय परीक्षा ,स्कॉलरशिप परीक्षा आणि सर्व विविध स्पर्धात्मक उपक्रमात भाग घेऊन आपल्या शाळेचे नाव कसे लौकिक होईल या दृष्टीने मुख्याध्यापक व सर्व सहाय्यक शिक्षक तसेच पालक प्रयत्न करणार आहेत. या शैक्षणिक सत्रात स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात यावा असे ठरविण्यात आले. पालक सभा झाल्यानंतर त्याच ठिकाणी माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला यात सर्व माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.या सहभागी माजी विद्यार्थीमधुन अध्यक्ष म्हणून बादल भगवान आंबीलढुके यांची अध्यक्ष म्हणून सर्वांनुमते निवड करण्यात आली. माजी विद्यार्थी संघ उपाध्यक्ष म्हणून अनिकेत गणेश उके यांची नियुक्ती करण्यात आली,तसेच कोषाध्यक्ष म्हणून दामोदर हरी आंबिलढुके यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी संजय मेहर, राजेश चोपकर, दामोधर देशमुख ,संजय आंबिलढुके, विलास भोंडे, कविता आंबिलढूके,कोमल मेश्राम, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजेश रोहाड, तर आभार प्रदर्शन शिक्षक सुधीर खंडाईत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद लिलाधर काळबांडे, सुधीर कांबळे ,सुजाता बोधेले , संगीता आंबिलढुके,प्रज्ञा रामटेके, उमेश उके, पुष्पलता उके, कैलास फटिंग यांनी केले.








