spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

येसंबा (नांदगाव) गावात पुन्हा बीबटयाचा धुमाकुळ

– शेतकऱ्याची ३ वर्षीय गौरव जातीची कारवळ गाय केली ठार, ५० हजारांचे नुकसान

कन्हान :- येसंबा गाव व परिसरात पुन्हा एकदा वाघा ने धुमाकुळ घालत गावालगतच्या शेतशिवारात गोठया त बांधलेल्या ३ वर्षिय गौरव जातीच्या कारवळ गाई वर बीबटयाने हल्ला करून ठार केल्याने गावातील तसेच आजुबाजुच्या परिसरातील गावात भीतीचे वाता वरण पसरून खळबळ उडाली आहे. यात पशुपालक शेतकरी रामराव केचे यांचे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

शनिवार (दि.३) जानेवारी ला सायंकाळी येसंबा (नांदगाव) येथील शेतकरी रामराव काशिराम केचे हे स्वत:ची गौरव जातीचे कारवळ नेहमी प्रमाणे चराई करून गावालगत शेतातील गोठयात बांधुन घरी निघुन आले. रविवार (दि.४) जानेवारी ला सकाळी रामराव केचे शेतातील गोठयात प्राण्याला चारा, पाणी करण्यास गेले असता त्याची ३ वर्षाची कारवळ खुट्यात बाधलेली मृत अवस्थेत दिसली असता गावक-याना बोलविले तर पहाटे सकाळी ५ वाजता दरम्यान शेत गोठयात बांधलेली ३

वर्षाची गौरव जातीचे कारवळ गाईची बीबटयाने शिकार केल्याचे लक्षात आल्याने रामराव केचेनी वन विभागाच्या अधिका-याना माहिती दिली असता वन सहायक क्षेत्र अधिकारी एस एम वासनिक व हंगामी वन मजुर फूलचंद नारनवरे हे पिआरटी चंमु सह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बिबटचे पायाच्या निशाणनुसार बिबट शेतात येऊन कारवळ गाईचे शिकार करून ठार केल्याने वन प्राणी बिबटयाची शोध मोहीम सुरु केली. आणि मृत कारवळचा पंचनामा करून पशु वैद्यकिय अधिका-या व्दारे शवविच्छेदन करून तसा अहवाल वरिष्ठाना पाठविण्याचे सांगितले.

येसंबा (नांदगाव) शेत शिवारात वाघ, बीबट्याचे भ्रमण करणे, मानवी व पाळीव पशुची शिकार करणे, हल्ल्याच्या घटना वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण होत शेतात काम करणे, जनावरे चारण्यास सोडणे. रात्री च्या वेळी घराबाहेर पडणे धोका दायक झाले आहे. पिडीत शेतकरी रामराव केचे यांचे ५० हजार रूपयाचे झालेले नुकसान वन विभागाने पिडित शेतक-यास त्वरित भरपाई द्यावी. तसेच बीबट व वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी ओमप्रकाश काकडे, चंद्रशेखर पडोळे, सुत्तम मस्के, श्यामजी, नरेश रक्षक, दिंगाबर ठाकरे, सुरज काळे सह गामस्थ शेतक-यांनी केली आहे.

Popular Articles