spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली 

– यु.पी.एस.सी. परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा केला गौरव

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :– तालुक्यातील शितलवाडी (परसोडा ) ग्रामपंचायत येथे थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शितलवाडी येथील यु.पी.एस.सी. परीक्षेत यश संपादन करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार सरपंच डॉ.जयश्री पपिश मडावी तथा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. “सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या. यानंतर यूपीएससी परीक्षेत यश संपादन करणारे तथा शितलवाडी गावाचे नाव उंचावणारे विद्यार्थी कुमारी डॉ. आदिती अशोक चव्हाण, कार्तिक मनोहरजी बावनकुळे, शुभम महाजन यांचा व त्यांच्या पालकांचा ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने स्वागत, सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सरपंच डॉ. जयश्री पपिस मडावी, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र मुरले, पोलिस पाटील सैलेश उजगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष नरेंद्र काळे, उपसरपंच प्रज्वल गेचोडे, ग्रा.पं. सदस्य अतुल यादव, धर्मराज रहाटे, स्वातीताई लोणारे, किशोर सहारे, संजय येनुरकर व ग्रामपंचायत कर्मचारी समाजबांधव, व गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles